11/09/2021
सुंदरबन जंगल सफारी: २८ ते ३१ जानेवारी,2022
रॉयल बंगाल टायगर हे वाघाचे नाव ज्या जंगला मुळे पडले ते पश्चिम बंगाल मधील २४ परगणा जिल्ह्यात स्थित सुंदरबन व्याघ्र प्रकल्प हे वाघांचे भारतातील सर्वाधिक संख्येने आढळ स्थळ आहे. सुंदरबन हे भरती व ओहोटीच्या फेऱ्यातील खारफुटीचे जंगल आहे. इथला वाघ अतिशय सोशिक . त्याला मोठ्ठ जनावर नाहीच मिळाले तरी तो मासे, खेकडे, बेडूक खाऊन देखील राहतो. इथे वनविभागाच्या मोजणी नुसार २५० पेक्षा जास्त वाघांचे वास्तव्य आहे. इथला वाघ एका बेटावरून दुसऱ्या बेटावर चक्क पोहोत जातो. या शिवाय येथे मासेमारू मांजर, चितळ, रानडुक्कर, गंगेची डॉल्फिन, इरावदी डॉल्फिन तसेच हॉक्स बिल व ऑलिव रिडले कासव, खाऱ्या पाण्यातील मगर सुद्धा आहे. इथे किंगफिशर या पक्ष्याच्या विविध जाती बघायला मिळतात. त्याशिवाय शेषारी हा समुद्र गरुड, बहिरी ससाणा, मँग्रुव्ह पिट्टा, पलासचा गरुड, करड्या डोक्याचा मत्स्य गरुड अशा प्रकारचे पक्षी पण दिसतात. ओहोटी झाल्यावर चिखलाने भरलेल्या काठांवर उड्या मारणारे सॅॅॅलॅमंडर व बिळातून बाहेर आलेले तांबडे भडक फिडलर खेकडे पाहताना खूपच मजा येते. इथली भ्रमंती बोटीतूनच करावी लागते.
ही सफारी दिनांक २८ जानेवारीला कोलकाता विमानतळ येथून सकाळी ९.३० च्या दरम्यान सुरु होऊन दिनांक ३१ जानेवारीला पुन्हा कोलकाता विमानतळ येथे संपेल. ३ रात्र आणि ४ दिवसांचे तेथील वास्तव्य हे ट्वीन शेरिंग वर असेल. इथली जंगल सफारी आपण बोटीतून करणार आहोत. मोजक्याच जागा उपलब्ध आहेत.
अधिक माहिती साठी ९९३०५६१६६७ या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा अथवा कॉल करा .