
07/06/2025
मी ही स्टोरी लिहितेय कस्टमरच्या फीडबॅकवरून…
काल एक विलक्षण अनुभव आला.
एक परिचित कुटुंब – जे त्यांच्या प्राण्यांवर जीवापाड प्रेम करतं – त्यांनी सकाळी एक मेसेज पाठवला. त्यांच्या गाईचं वासरू नुकतंच दाव्याच्या फासात अडकून गेलं होतं आणि त्यांना प्रश्न होता – "त्याच्याशी बोलता येईल का?"
मी ट्युन झाले आणि ते वासरू अगदी हळू आवाजात बोलायला लागलं. काही शब्द, काही भावना...
आणि त्याचवेळी, माझ्या तोंडात एकदम गूळ आणि बारीक दाण्याची चव यायला लागली.
मी हे निरीक्षण त्यांनाही सांगितलं. त्यांना तेव्हा फार काही आठवलं नाही.
आज सकाळी त्यांचा मेसेज आला...
त्या वासराच्या निधनाच्या आधी, कोणीतरी त्यांना ancestors साठी गाई-वासरांना तिळगुळाचे लाडू खायला घालायला सांगितलं होतं.
गाई फारसे खात नव्हत्या… पण ते वासरू रोज प्रेमाने खायचं ते लाडू.
त्यांनी काल त्याच्या आठवणींनी भारलेली शोकसभा घेतली आणि त्या वेळी त्यांनी दोन-तीन तिळगुळाचे लाडू त्याच्यासाठी बनवले होते…
त्याने हेच सांगितलं. त्याच्या आठवणींमध्ये, त्या चवीतून, त्या भावनेतून तो त्यांचा स्पर्श, प्रेम आणि श्रद्धा व्यक्त करत होता.
कधी कधी हे प्राणी आपल्या जगातून जातात, पण त्यांची आठवण, त्यांची ऊर्जा, त्यांच्या आवडी – आपल्यात खोलवर उमटलेली असते.
हे केवळ टेलिपथी नव्हे… हे एका जीवाचं "धन्यवाद" म्हणणं होतं… त्याच्या भाषेत.
🕊️
Whispers of Minds by Yogita
योगिता हर्णे
9029284373